तुफान वारे
पेटून ऊटले रान हे सारे
सांगत सुटले तुफान बारे
ऊटा...ऊठा...!!ऊटा...!!!
न्याय देवता अन्यायाला उघडून डोळे बघते
एक पारडे रक्तमासाचे अन् दुसरे पारडे पैशाचे
रक्तामासाचे वजन थोडके माप पैशाचे झुकलेले
मानवतेला किंमत कुठली, पापाचे दर चढलेले
माणुसकीची किंमत कवडी,
सांगत सुटले तुफान वारे. ...!!!
उत्पात हा जगी वाढला, यमदेव हिशरमून गेला
वधस्तंभ हि झुकले खाली पाहून क्रूर कर्माला
आईबहिणीची इजत लुटती विसरुन सगळी नाती
कोण कुणाचे जगीनं उरल विसरले सगळे नीती
माणूसकीची रास जळाली
सांगत सुटले तुफान वारे.. ...!!!
बंधू भावाचे विसरुन नाते जन्मोजन्मीचे वैरी झाले
दिन सौख्याचे ते विरुन गेले राज दुष्टांचे आले
खंजीर हिंसेचा घेऊन हाती स्वशिरच्छेद करती
नतमस्तक ना कुणास होती, नाम ईश्वरी विसरुन जाती
माणुसकीचे रक्त वाहते
सांगत सुटले तुफान वारे. ...!!!
