Showing posts with label चातक एक आशावाद*. Show all posts
Showing posts with label चातक एक आशावाद*. Show all posts

Saturday, May 31, 2025

चातक एक आशावाद

*चातक एक आशावाद* 



चातकाची तहान भागवण्यासाठी पावसाचा एक थेंब पुरेसा असतो... 
काही माणसं पावसासारखी तर काही चातका सारखी असतात 

कोणता पाण्याचा थेंब चातकाच्या चोचीत जाणार हे त्या थेंबाच्या  नशिबात ही असावं लागत
अन् तो मिळण्यासाठी   चातकाचे सुद्धा  नशीब बलवत्तर असावं लागते
नाहीतर तो तहानलेलाच  मरेल हे मात्र निश्चित असत 

पावसाचं काय तो काही ठरवेल
मनाला येईल तसा हट्टी पणा करेल
बरसायच ठरवलं तर किती बरसेल
पण ......

लहरीपणा केला अन् रुसून बसला
समजून उमजून पाऊस दडून बसला 
मग  चातकाला आशेवर  लागत जगावं
बरसेल  म्हणुन  आभाळाकडे लागत बघाव 
पाऊस बरसला काय अन् बरसला नाय
चातकालाच  सोसावं लागत अन सहनही  करावं लागत 
दुर्दैव आलच आडव तर बलिदान 
ही द्यावा लागत 

पावसाचं काय तो काही ठरवेल
मनाला येईल तसा हट्टी पणा करेल
बरसायच ठरवलं तर किती बरसेल
पण .....
नाहीच बरसला तर  तहानलेला चातक  निश्चित निश्चित मरेल

कवी 
प्रा. डॉ. विधिन कांबळे