Showing posts with label तसबीर. Show all posts
Showing posts with label तसबीर. Show all posts

Sunday, November 17, 2019

तसबीर -


तसबीर




परीट घडीतल्या कपड्याकडे बघून
माझ्या काडाच्या घरात आलीस
अन् दबकत -दबकत भुईसऱ्यावर बसलीस

कुडाच्या भिंती न्याहाळताना
दारावरची तसबीर तुला दिसली
तसं अवसान एकवटून दचकलीस

पश्चातापाची पाल तुझ्या मनात चुक-चुकली
झटक्यात ऊठन माझ्या तोंडावर थुंकलीस
अन डोळ्यात पाणी साठवुन
तुफानासारखी निघून गेलीस

अगं वेडे
त्यांनच आम्हाला माणसात बसवलं
माणसांच माणुसपण शिकवलं
ठोकरतो तुझ्या लटक्या प्रेमाला!
पण नाही उतरवणार भिंतीवरल्या तसबरीला


कवी : प्रा. डॉ. विधिन कांबळे