Sunday, December 4, 2022

ज्ञानदिप हा लावू जगी !!! कवी प्रा. डॉ. विधीन कांबळे

 ज्ञानदिप हा लावू जगी !!!


ध्येय अमूचे गिरी शिखरांचे

न्याय, समता, स्वातंत्र्याचे  

उत्तुंगाचा ध्यास आम्हाला

ज्ञानदिप हा लावू जगी          !! /k` !!


स्वार्थ बुद्धी ही देऊ त्यागून

दाही दिशाना  टाकू उजळून

बंधुत्वाची जोडून नाती

ज्ञानदिप हा लावू     जगी              !! 1 !!


रचिला पाया ज्या धूरिनी

टेकऊ माथा त्यांच्या चरणी

स्वप्न तयांचे मनी बाळगून

ज्ञानदिप हा लावू जगी               !! 2 !!


फडकत ठेऊ निशाण अमूचे  

माणदेश अन भूमातेचे

विधिलिखित हे अविरत राहील

ज्ञानदिप हा लावू जगी               !! 3 !!

 
कवी प्रा. डॉ. विधीन कांबळे 

Tuesday, May 18, 2021

वाट - The Road ( Dr. Vidhin Kamble)

 


वाट



 

आयुष्याच्या वाटेवर चालताना

प्रत्येकानं मला ढकलून दिलं

आपल्याच माणसांनी, वाटेत चुकवलं

धडपडून उठलो स्व:ताला सावरलो

वाट चुकलो म्हणुन, नाही घाबरलो

माझी मी नवी वाट शोधली

जी मला एकट्यालाच

पदस्थ करावी लागली

चालताना वाट

प्रथम उजाड वाटली

पुढं-पुढं जाणवल,

हि वाट देते मायेची सावली

मी शोधलेली वाट,

यशाच्या शिखरावर जात होती

मला ढकलुन देणारी माणसं

मात्र पायथ्यालाच धडपडत होती.




 

 


पुतळ्यांचा पुर्नगृत्यू Dr. Vidhin Kamble

 

पुतळ्यांचा पुर्नगृत्यू

 '






चौका-चौकात बसवलेत.

अर्धे-अधिक,....माणसांनीच

जयजयकार करुन

मेल्यानंतर.

पण जीवंत आहेत अजून

बसलेत श्वास कोंडून

बघताहेत डोळे उघडून

रणकंदन....

त्यांच्याच नावाने

चौका-चौकात.

ज्यांच्या जगण्यासाठी

जीवंतपणी ते मयत जगले

त्यांच्याच जगण्यसाठी

हसत-हसत सुळावरचढले

तीच माणसं

जय-जयकार करणारी

उभी आहेत, चौका-चौकात

त्याच पुतळ्यांचा पुर्नमृत्यू

आज सक्तीनं मागतात.

 

 






Thursday, May 6, 2021

गर्भ (The Fetus) Dr. Vidhin Kamble

                    गर्भ



                             

                                              उजाड गाव

वाळूत नाव

झाडाच्या फांदीला

पिवळा पाला..

अंड कोकिळेचं

ढोलीत घुबडाच्या

चोचीत खडा

व्याकुळ कावळ्याच्या.

गाय कपिली

पाडी छकुली

गोठ्यात कुडाच्या

हापाळलेली.....

मोडक्या माडीला

आधार मेडीचा

गढीचा ढिगार

दगडमातीचा.......

पार वडाचा

नाठी म्हाताऱ्यांचा.

पोर मिशीतली

हमीच्या मातीत

नशीब चाळतात

डोईवर जगण्याचा

भार वहातात........


चपकारं उन्हाचं

उघड्या अंगावर

लाज झाकायला

फाटका पदर........

रखरखीत सूर्य

घामातुन वाहत

जळालेलं  विर्य

खोलवर रुजतं...

भाजक्या मातीत

जगण्याच मर्म......

धडपडतो श्वासाला

मातीतला गर्भ...

 

Friday, November 22, 2019

हे देवा



हे देवा


हे देवा......
तु या धरतीवर असता जन्म घेतला
तर असतं तुलाही कळलं
कसं माणसांनीच माणसाला छळलं.

हे देवा......
आम्ही असुन धरतीची लेकरं
झालो कसे दिशाहिन पाखरं
असुन माणस, आम्हालाजनावरांच जीनं आलं
तुला  माणुसपण यायला.....
तुझं देवपण असतं घालवावं लागलं....


हे देवा.......
पाण्याबिगर कसलं ते जीनं
जीनं पाण्याबिगर आहे उणं
पाण्यासाठी नशीचीवण-वण भटबण आलं
तुला तहान भागवण्यसाठी.....
असतं गळ्यात गाडग बांधव लागलं.....

हे देवा....
दिवसाला सुध्दा आमचा विटाळ आला
सावलीचाही अधिकार आमच्या झुगाराला
तरीही हसत जगलो ध्या-दुपारीला
तुला अस्तित्व टिकवायला.....
तुझं सत्व असतं घालवावं लागलं..

हे देवा......
माणसं माणसासारखी आम्ही माणसातली
आम्हा दिली ना जागाही मसणातली
तीन फुट जागा मिळवायला.
देवा असतं तुला ही मरावं लागलं.


Sunday, November 17, 2019

तसबीर -


तसबीर




परीट घडीतल्या कपड्याकडे बघून
माझ्या काडाच्या घरात आलीस
अन् दबकत -दबकत भुईसऱ्यावर बसलीस

कुडाच्या भिंती न्याहाळताना
दारावरची तसबीर तुला दिसली
तसं अवसान एकवटून दचकलीस

पश्चातापाची पाल तुझ्या मनात चुक-चुकली
झटक्यात ऊठन माझ्या तोंडावर थुंकलीस
अन डोळ्यात पाणी साठवुन
तुफानासारखी निघून गेलीस

अगं वेडे
त्यांनच आम्हाला माणसात बसवलं
माणसांच माणुसपण शिकवलं
ठोकरतो तुझ्या लटक्या प्रेमाला!
पण नाही उतरवणार भिंतीवरल्या तसबरीला


कवी : प्रा. डॉ. विधिन कांबळे