तु गेल्यावर
आसवांचा पूर, डोळ्यात मावेना
धुंद सुरावटींचं गाणे, माझ्याच्याने गावेना
तु गेल्यावर...!
हृदयातलं काहूर, आवरता आवरेना
तुझ्या सहवासाचं फूल, मिटता मिटेना
तु गेल्यावर...!
रात्र जागण्यास पुरेना, पापण्या मिटल्यातरी
आसवांचा पूर, सरता सरेना
तु गेल्यावर
काळजात थरथर, उर खालीवर
श्वास तुझा की माझा, कळता कळेना
तु गेल्यावर...!