Sunday, November 17, 2019

तुफान वारे -


तुफान वारे

पेटून ऊटले रान हे सारे
सांगत सुटले तुफान बारे
ऊटा...ऊठा...!!ऊटा...!!!


न्याय देवता अन्यायाला उघडून डोळे बघते
एक पारडे रक्तमासाचे अन् दुसरे पारडे पैशाचे
रक्तामासाचे वजन थोडके माप पैशाचे झुकलेले
मानवतेला किंमत कुठली, पापाचे दर चढलेले
माणुसकीची किंमत कवडी,
सांगत सुटले तुफान वारे. ...!!!




उत्पात हा जगी वाढला, यमदेव हिशरमून गेला
वधस्तंभ हि झुकले खाली पाहून क्रूर कर्माला
आईबहिणीची इजत लुटती विसरुन सगळी नाती
कोण कुणाचे जगीनं उरल विसरले सगळे नीती
माणूसकीची रास जळाली
सांगत सुटले तुफान वारे.. ...!!!


बंधू भावाचे विसरुन नाते जन्मोजन्मीचे वैरी झाले
दिन सौख्याचे ते विरुन गेले राज दुष्टांचे आले
खंजीर हिंसेचा घेऊन हाती स्वशिरच्छेद करती
नतमस्तक ना कुणास होती, नाम ईश्वरी विसरुन जाती
माणुसकीचे रक्त वाहते
सांगत सुटले तुफान वारे. ...!!!


कवी : प्रा. डॉ. विधिन कांबळे

Monday, November 4, 2019

Tuesday, October 15, 2019

ध्वज - The Flag


  

ध्वज

कवी : प्रा. डॉ. विधिन कांबळे

उगवलेला स्वतंत्र सूर्य आहे झाकाळला
कळेना या भूमीवर असा अंधार का दाटला ?
आसमंतात सारे ध्वजच लागलेत फडफडायला
मी वंदन करू कुठल्या ध्वजाला
जाऊ कोणत्या ध्वजाच्या आश्रयाला-----

सारे फळेच गेलेत तिरंग्याला
प्रयेकाने एक-एक तुकडा पळवला
त्याचाच ध्वज करून लागलेत नाचायला !
कळेना हाती घेऊ कोणत्या ध्वजाला -----

ध्वजाच्या बुडाशी रक्ताचा सडा सांडलेला
कळेना थेंब रक्ताचा कोणाचा कुठला
तरी ही कौटाळून बसलेत ध्वजाला
विसरून रक्ताच्या एक रंगला
जाऊ कोणत्या ध्वजाच्या आश्रयाला----

तिरंग्या साठी ज्यांनी छातीचा कोट केला
देह त्यांचा तोफगाडीवर नेला
अस्थीत्यांच्या आहेत तिरंग्यात बांधलेल्या
मी हर देऊ कोणत्या ध्वजाला
जाऊ कोणत्या ध्वजाच्या आश्रयाला-----

सारे ध्वजच बांधलेत माझ्या अंगाला
देह माझा आहे दोरखंडानी आवळला
हातच बांधले आहेत माझे
सावरू कोणत्या ध्वजाला  
जाऊ कोणत्या ध्वजाच्या आश्रयाला----

इथं  भेगा पडल्या आहेत मातील 
जो तो हद्द समजतो प्रत्येक भेगेला
तडाच गेला आहे इथल्या एकतेला 
सगळेच विसरलेत समतेला
जाऊ कोणत्या ध्वजाच्या आश्रयाला

वरून एकतेच पांघरून असलेला
माझा देश आहे आतून विस्कटलेला
नका विसरू अशोकचक्राला
ज्याने मानवतेचा धर्म दिला
जाऊ कोणत्या ध्वजाच्या आश्रयाला

सांगाडा - (The Skeleton)




आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा पोवाडा Raje Umaji - रचनाकार प्रा. डॉ. विधीन कांबळे (Dr. Vidhin Kamble)